एक कोडं

एक कोडं
ते दिवस होतेच तसे....
गुलाबी थंडीतल्या त्या
कोवळ्या उन्हासारखे.....
हवेहवेसे........
त्यावेळेस सर्वच कसं विलोभनीय....
पण मग आज ?
कुठेशी गेली ती ओढ ?
का आपल्यातल्या अंतराने.....
आपल्यालाच अंतर दिलं ?
तोच तु, तीच मी .... तरीही....
एक न उलगडणारं कोडं....
मनाच्या कोपरयात ठेवलेलं गुपित
असं अचानक कोमेजावं ?
तुझ्या माझ्यातले संवाद
असे मध्येच का गोठावेत ?
स्वत:चाच स्वता:वर
विश्वास बसेनासं काहीतरी .....
खरंच काहीतरी झालय खरं.....
बघ, उलगडतयं का कोडं .....
मी आहे इथेच,
वाट पहात,
उत्तराची अन.............
1 comment:
plz atleast put my name under the poem .. dont just copy it .. :(
\ PRadnya Panhale
Post a Comment