आंधळं प्रेम

आंधळं प्रेम
जन्मापासूनच अंध होता तो तरीही ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची;तोही तीच्यावर तीतकेच प्रेम करायचा..एक दिवस तीने त्याला लग्ना विषयी विचारले...
"ज्या दिवशी मी तुला पाहू शकेन त्याच दिवशी मी लग्न करीन" तो म्हणाला.
ती उदास झाली...कित्येक दिवस असेच गेले.
पण एक दिवस...
त्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं;कोणा अनामीकाने दान केलेल्या डोळ्यांमुळे आज तो अंधतेच्या श्रापातून मुक्त झाला....आता तो सर्वकाही पाहू शकत होता पण त्याला तिला पहायचे होते,तो सरळ तिच्याकडे निघाला...
त्याची नजर तिला शोधत होती पण ती मात्र दिसत नव्हती,पाठीमागून ओळखीचा आवाज आला; त्याने तीचा आवाज लगेचच ओळखला आणी उत्सुकतेने वळून पाहीले, समोर ती उभी होती, क्षणभर त्याला विश्वास बसेना;
डोळ्यांवर काळा चष्मा आणी हातात काठी घेऊन उभी असलेल्या तीच्याकडे तो तसाच पहात राहीला;
तीने त्याला विचारले "माझ्याशी लग्न करशील?"
त्याने नकार दिला आणी चालू लागला.
ती म्हणाली "ठीक आहे, पण माझ्या डोळ्यांची तेवढी काळजी घे".
No comments:
Post a Comment