आशा

जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली..
प्रस्तावना : ह्या कवितेत एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या भेटीची इच्छा व्यक्त करते आणि ह्या प्रेमाच्या नात्याला विवाहाच्या निर्मळ बंधनात गुंफण्याची जिद्द व्यक्त करते.
** जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली.. **
जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली,
तेव्हा तेव्हा पायात माझ्या, बेडी मी पाहिली..
खळकन ओघळले अश्रू गालावरी,
प्रत्येक अश्रूत तुझी प्रतिमा मी पाहिली..
अश्रूंस त्या अलगद मी उचलले,
प्रतिमेस त्या ओठांनी स्पर्शिले..
क्षणांत चेह-यावर हास्य विखुरले,
जरी मनात वेदनेचे बांध होते फुटले..
अशीच होणार का रे आपली भेट,
किना-यांची नजरानजर जशी होते थेट..
प्रेमाला या, नजर का लागावी जगाची,
पण,प्रेमिकांनीही हार कधी ना मानली..
तोडायला बेडी आता, ये तू अश्वावरी,
मी मेहंदीने, कडी बघ एक तोडली..
मंगल या सूत्रांत गुंफूनी प्रीत आपुली,
चालूया अग्निसाक्षीने मंदिरात सप्तपदी..
No comments:
Post a Comment