
कधी वाटते ...
आज वाटते फुल फुलावे
तुझीया कोमल ओठांचे ,
कधी वाटते प्राषून घ्यावे
टिपूर चांदणे तूझ्या रूपाचे..
मुक्त फिरावे पाखरू चंचल
तुझीया दोन नयनांचे...
स्वर घुमावे कानी अवचित
तुझीया सुरेल कंठाचे..
अशीच व्हावी संगत गंधीत
तुझीया जवळ असण्याने
अन
असेच गावे गीत सुरातच
तुझीया माझ्या प्रीतीचे....
Publish By
एक मन
at
25.6.07
1 comment:
plz atleast put my name under the poem .. dont just copy it .. :(
\ PRadnya Panhale
Post a Comment