भेट आपली......

भेट आपली......
काल जेव्हा तु रस्त्यात भेटला होतास,
एक प्रेमपुर्ण कटाक्ष तुही टाकला होतास....
हर्ष माझ्या मनीचा दाटून आला होता
खुप होते उरी तरीही ,
ओठांवर होते मात्र जड ओझे..
माझा खुललेला चेहरा
तुलाही जाणवला होता..
भेट मात्र ती क्षणभराचीच होती
वाटलं होतं तेव्हा
असाच तू जवळ रहावास
तुझ्या कुशीत शिरुन
स्वर्गच इथुन अनुभवावा
पण स्वप्न माझे शेवटी
स्वप्नच राहीले होते ....
निर्णय तेव्हा तूच घेऊ शकत नव्हातास
म्हणुनच इच्छा असुनही
निरोप तूच घेतलास
मग मात्र एवढचं वाटलं......
परदेशीच जर जायचं होतं
नॊकेत बसुन तुला ....
तर निरोपापुरतच का बोलावलस
किनारयावरती मला !
... प्रज्ञा
2 comments:
Fakta etkach sangna ahe vinayak...tu mazhya kavita copy kelyas thik ahe pan sobat naav pan kela astas tar khup changla vatla asta....tu jar swata kavita karat asshil tar tula vatla asel ..aapli pratyek kavita jenvha kavita mhanun kagdavar utarte tenvha tyat kaay bhavana astat... bagh jamla tar naav ghal ..
thanks for writting my name... but it would be great if u could write my full name and for my all poems ...ऋतु.. कधी वाटते ....एक कोडं ...तुझं असणं and भेट आपली. Also ajun konachya kavita astil tar tyanchi pan nava lihi plz... thanks
Post a Comment